29.8 C
Latur
Saturday, December 3, 2022
Homeमनोरंजनदीपिकाला रुग्णालयातून डिस्चार्ज

दीपिकाला रुग्णालयातून डिस्चार्ज

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या चर्चेत आहे. दीपिका पदुकोणला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती खालावल्याने तिला मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या दीपिकाची प्रकृती सुधारली असून तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

रिपोर्टनुसार, दीपिकाची प्रकृती आता सुधारली आहे. तिच्या काही टेस्टदेखील करण्यात आल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वीदेखील दीपिकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जून महिन्यात एका सिनेमाच्े शूटिंग सुरू असताना दीपिकाची प्रकृती खालावली होती. त्यावेळीदेखील तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दीपिकाचे अनेक प्रोजेक्ट सध्या पाईपलाईनमध्ये आहेत. अमिताभ बच्चन यांच्या ‘द इंटर्न’ या सिनेमात दीपिका दिसून आली होती. तसेच ‘पठाण’, ‘फायटर’, ‘प्रोजेक्ट’ हे दीपिकाचे आगामी चित्रपट असून या चित्रपटांच्या माध्यमातून ती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दीपिकाचा ‘पठाण’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात दीपिकासोबत शाहरूख खानदेखील दिसणार आहे. दीपिकाने शाहरूखसोबत तिच्या सिनेसृष्टीतील करिअरला सुरुवात केली होती.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या