26.5 C
Latur
Sunday, January 17, 2021
Home मनोरंजन ‘धूम ४’मध्ये लेडी व्हिलनच्या भूमिकेत दीपिका पदुकोण

‘धूम ४’मध्ये लेडी व्हिलनच्या भूमिकेत दीपिका पदुकोण

एकमत ऑनलाईन

मुंबई : धूम च्या चौथ्या सीझनची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. याबद्दल चाहतेही खूप उत्सुक आहेत. सिनेमाच्या पहिल्या फ्रेंचायझीमध्ये जॉन अब्राहम, दुस-­यात हृतिक रोशन आणि तिस-यात आमिर खानने जबरदस्त ऍक्शनने प्रेक्षकांना प्रभावित केले. रिपोर्टनुसार धूम ४ मध्ये जॉन अब्राहम आणि हृतिक रोशन एकत्र दिसू शकतात. याशिवाय दीपिका पदुकोण या सिनेमात लेडी व्हिलनच्या भूमिकेत दिसणार आहे.

पहिल्यांदा दीपिका आणि जॉन दिसणार एकत्र
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दीपिका आणि हृतिक गेली कित्येक वर्षे इंडस्ट्रीमध्ये आहेत. दोघांनीही आतापर्यंत एकाही सिनेमात एकत्र काम केले नाही. यशराज कित्येक वर्षांपासून या दोघांना एका प्रोजेक्टमध्ये एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत. हे आता धूम ४ च्या माध्यमातून शक्य होईल. एकीकडे हृतिक पहिल्यांदाच दीपिकाबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. दुसरीकडे, तो पहिल्यांदा जॉनबरोबर काम करतानाही दिसणार आहे.

चौथ्या भागात प्रेक्षकांना ट्विस्ट पाहायला मिळाला. यशराज फिल्म्सच्या धूम ४ ला आता आदित्य चोप्राला वेगळ्या पातळीवर नेण्याची इच्छा आहे. ज्यासाठी त्याने चित्रपटाच्या पटकथेसाठी मनीष शर्माची निवड केली आहे. धूम ४ ची कथा एका सुंदर स्टायलिश चोर (दीपिका पदुकोण) वर आधारित असेल.

 

श्रुतिका माने ठरली ऑस्ट्रेलिया मिस इंडिया ची विजेती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या