22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमनोरंजनदीपिका-रणवीरने अलिबागमध्ये खरेदी केला आलिशान बंगला

दीपिका-रणवीरने अलिबागमध्ये खरेदी केला आलिशान बंगला

एकमत ऑनलाईन

मुंबई : रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांनी शुक्रवारी त्यांच्या अलिबागमधील नव्या घरामध्ये गृहप्रवेश केला. यासंबंधित फोटो रणवीर आणि दीपिकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
त्यांचे हे घर मुंबईपासून जवळपास ९० कि.मी. लांब समुद्र किना-याजवळ स्थित आहे. रणवीर आणि दीपिकाने हे घर गेल्या वर्षी खरेदी केले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, रणवीर आणि दीपिकाने या संपत्तीसाठी २२ कोटींचा खर्च केला आहे. याव्यतिरिक्त दोघांनीही संपत्तीच्या स्टॅम्प ड्युटीसाठी १.३२ कोटींचा खर्च केला आहे. ही संपत्ती अलिबागजवळील मपगावमध्ये आहे जी, ९००० स्क्वेअर मीटरमध्ये पसरलेली आहे. मीडिया रिपोर्टस्च्या मते, याआधी जुलै २०२१ मध्ये दीपिकाने बंगळुरूमध्ये देखील एक महागडे घर खरेदी केले आहे.

मागील काही दिवसांपूर्वी रणवीर सिंहने एक नवीन घर खरेदी केले होते. मात्र या अपार्टमेंटचे अजून बांधकाम पूर्ण झालेले नाही. त्यांनी ज्या अपार्टमेंटची बोलणी केली आहे, तिथून अरबी समुद्राचे सुंदर दृश्य पाहता येते. रणवीर सिंहने हे घर ११९ कोटींना खरेदी केलेले आहे. इतकेच नव्हे तर हे अपार्टमेंट शाहरूख खानचा ‘मन्नत’ आणि सलमान खानचा ‘गॅलेक्सी’ बंगल्याच्या मध्यावर आहे.

या चित्रपटात दिसणार दीपिका
अभिनेत्री दीपिका पदुकोण लवकरच ‘फायटर’च्या चित्रीकरणासाठी सुरुवात करणार आहे. ‘फायटर’ चित्रपटाला भारतातला पहिला अ‍ॅक्शन चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे. ‘बँग बँग’ आणि ‘वॉर’ नंतर ऋतिक रोशन आणि सिद्धार्थ आनंदचा हा तिसरा चित्रपट आहे. ‘फायटर’ पुढच्या वर्षीच्या ऑक्टोबरपर्यंत रिलीज होणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या