24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमनोरंजनमराठमोळ्या लावणीवर दीपिकाने धरला ठेका

मराठमोळ्या लावणीवर दीपिकाने धरला ठेका

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलीवूडप्रमाणेच टेलिव्हिजनवरील सेलिब्रेटीच्या घरीही गणेशोत्सवाचे आगमन झाले आहे. त्याचबरोबर सगळेच सेलिब्रेटीही हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी खूप उत्साही आहेत.
सेलिब्रेटींचा उत्साह बघता सगळ्यांनीच सोशल मीडियाला जवळ केले आहे.

अशातच दीपिका सिंग ने तिचा असाच एका डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. टेलिव्हिजन अभिनेत्री दीपिका सिंग गोयल हिने तिचा एक नवा डान्स व्हिडीओ इन्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात ती लावणी करताना दिसते आहे.
टीव्ही स्टार दीपिका सिंग सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

काल गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर ‘दिया और बाती हम’ फेम अभिनेत्रीनं तिचा डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. केशरी रंगाची नऊवारी साडी घालून तिनं ‘लावणी’ करत आहे. अभिनेत्रीचा हा डान्स व्हिडिओ सर्वत्र गाजत आहे. डान्स करताना दीपिका सिंगने खास पद्धतीने चाहत्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या