24.8 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeमनोरंजनसदोष चाचणी किटमुळे कोरोना : चिरंजिवी

सदोष चाचणी किटमुळे कोरोना : चिरंजिवी

एकमत ऑनलाईन

हैदराबाद : काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजिवी यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. त्यांनी ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली होती. आता चिरंजिवी यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली असल्याचे त्यांनी पोस्ट शेअर करत म्हटले आहे. तसेच त्यांनी पोस्टमध्ये सदोष टेस्ट किटमुळे आधीची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह असल्याचे सांगितले आहे.

कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यापासून चिरंजिवी हे होम क्वारंटाईन होते. त्यांना करोनाची कोणतीही लक्षणे जाणवत नव्हती. आता चिरंजिवी यांनी ट्विट करत सदोष टेस्ट किटमुळे आधीची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती आणि आताची कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्याचे सांगितले आहे.‘डॉक्टरांनी माझी तिन वेळा कोरोना चाचणी केली आणि ती चाचणी निगेटीव्ह आली आहे. सदोष टेस्ट किटमुळे आधीची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती’ असे चिरंजिवी यांनी ट्विट करत म्हटले आहे.

चिरंजिवी हे लवकरच ‘आचार्य’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु करणार होते. पण त्यापूर्वी त्यांनी कोरोना चाचणी करुन घेतली आणि ती पॉझिटीव्ह आली होती. आता त्यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे. ‘आचार्य’ या चित्रपटात चिरंजिवी हे दोन भूमिका साकारणार आहेत. चाहत्यांमध्ये या चित्रपटाची घोषणा करताच उत्सुकता पाहायला मिळाली होती.

आ. यशवंत माने यांना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा दिलासा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या