18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeमनोरंजन‘देसी गर्ल’ लेकीसोबत येणार भारतात

‘देसी गर्ल’ लेकीसोबत येणार भारतात

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राने बॉलिवूडच्या अनेक लोकप्रिय सिनेमांत काम केले आहे. लग्नानंतर प्रियांका नव-यासोबत म्हणजेच निक जोनससह लॉस एंजेलिसमध्ये स्थायिक झाली. आता तीन वर्षानंतर प्रियांका आपल्या लेकीसोबत भारतात येत आहे.

प्रियांका पहिल्यांदा लेकीला घेऊन भारतात येणार असल्याने तिच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. सोशल मीडियावर बोर्डिंग पासचे फोटो शेअर करत प्रियांकाने चाहत्यांना माहिती दिली आहे. तीन वर्षांनी भारतात येण्यासाठी प्रियांका खूप उत्सुक आहे.

प्रियांकाने सोशल मीडियावर बोर्डिंग पासचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत तिने लिहिले आहे, अखेर तीन वर्षांनी घरी जात आहे . कोरोनानंतर प्रियांका पहिल्यांदाच भारतात येत आहे.

प्रियांका आणि निक जोनस डिसेंबर २०१८ साली लग्नबंधनात अडकले आहेत. तसेच प्रियांका आणि निकला मालती नावाची गोंडस मुलगी आहे. प्रियांका परदेशात राहत असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आयुष्यासंबंधीत प्रत्येक अपडेट ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतीच प्रियांका लेकीसोबत दिवाळीचा सण साजरा करताना दिसून आली. सेलिब्रेशनचे फोटोदेखील तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या