मुंबई: धक धक गर्ल माधुरी दीक्षितचे वय झाले आहे ५५ वर्षे, पण आजही तिचे सौंदर्य हे पंचवीशीतल्या तरुणीला देखील लाजवेल असेच आहे. माधुरीने खूप लवकर बॉलीवूडला रामराम ठोकला आणि ती संसारात रममाण झाली. अर्थात तिने दोन्ही गोष्टी एकत्र जमणार नाही अशी खुली कबुली देऊनच संसाराची निवड केली. एवढे करून दुसरी एखादी अभिनेत्री खरंच एक संसारी स्त्री झाली असती. पण माधुरीने आपलं वेगळेपण जपलं.
संसारात असून सुद्धा तिने स्वत:ची सौंदर्यवती ही ओळख कधीच कमी होऊ दिली नाही. म्हणूनच बॉलीवूडमध्ये सक्रीय नसून सुद्धा सर्व बॉलीवूडची नजर नेहमी तिच्यावर राहिली. स्टाईल आणि फॅशनचा असलेला आपला सेन्स तिने कधीच हरवू दिला नाही आणि म्हणूनच आजही या वयातही ती आपल्या प्रत्येक लुकने चाहत्यांना घायाळ करत असते.
माधुरी लुक्समध्ये विविध प्रकारचे प्रयोग करते. ती मागच्या पिढीची अभिनेत्री वगैरे स्वत:ला अजिबात मनात नाही. सध्या जे काही ट्रेडिंग आहे ते ट्राय करण्यावर तिचा भर असतो. मग ते वेस्टर्न असो की पारंपारिक! मात्र एक गोष्ट माधुरीचा कोणताच चाहता अमान्य करणार नाही की माधुरीला साडी लुक सर्वात जास्त सूट होतो साडीमध्ये माधुरी अगदीच किलर दिसते. मग तिचा साडी लुक मॉडर्न असो की अगदीच मराठमोळा पारंपारिक! साडी लुक मध्ये माधुरीला पाहणे म्हणे निव्वळ सुख असते. असाच तिचा एक साडी लुक वायरल झाला आणि नेटीझन्स पुन्हा नव्याने तिच्या प्रेमात पडले.
माधुरीने या लुकमध्ये ब्ल्यू कलरची साडी परिधान केली होती आणि ही साडी बनवण्यासाठी सिल्क फॅब्रिकचा वापर केल्याचे सहज ओळखता येत होते. याशिवाय साडीवर प्रिंटसोबत जरीची लेस लावलेली होती जी खूपच जास्त सुंदर वाटत होती.