25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमनोरंजनपहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर आपटला ‘धाकड’

पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर आपटला ‘धाकड’

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून कंगना राणावतच्या ‘धाकड’ चित्रपटाची चांगलीच चर्चा होती. कंगनाचे फॅन्स तिच्या हा चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत होते. अखेर शुक्रवारी कंगना राणावतचा ‘धाकड’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. हा चित्रपट हिट ठरेल असा अंदाज वर्तवण्यात येत होता. परंतु, चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईनंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला आहे असेच म्हणता येईल.

पहिल्या दिवसाच्या कमाईचा आकडा पाहून क्वीन कंगनाही नक्कीच निराश झाली असावी. ‘धाकड’ चित्रपट पहिल्या दिवशीच कमाईचा दुहेरी आकडा गाठण्यास अपयशी ठरला. पहिल्याच दिवशी चित्रपट फ्लॉप झाला आहे.
कंगनाच्या ‘धाकड’चे ओपनिंग कलेक्शन तिच्या करिअरमधील ‘जजमेंटल है क्या’ आणि ‘पंगा’ या शेवटच्या दोन फ्लॉप चित्रपटांपेक्षाही कमी आहे. या चित्रपटाला मिक्स रिव् ू मिळाले होते, त्यामुळे आणि स्पाय अ‍ॅक्शन चित्रपट असल्याने तो चांगला व्यवसाय करेल अशी अपेक्षा होती. शिवाय बॉक्स ऑफिसवर ‘भूलभुलैया २’ शिवाय आणखी दुसरा मोठ्या बॅनरचा चित्रपट रिलीज झाला नव्हता, त्यामुळे त्याचाही फायदा ‘धाकड’ला होईल, असे म्हटले जात होते. परंतु कंगनाच्या ‘धाकड’ला प्रेक्षकांनी नापसंती दर्शवली आहे.

‘धाकड’ देशभरातील जवळपास २२०० सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. प्रमोशनच्या खर्चाचा समावेश केला तर ‘धाकड’चे एकूण बजेट ८५ कोटी रुपयांच्या आसपास आहे, तसेच कंगनाने या चित्रपटासाठी २० कोटी रुपये मानधन घेतल्याचीही माहिती मिळत आहे. पहिल्या दिवसाची कमाई पाहता ‘धाकड’ बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी आपल्या हिरोईनची फीदेखील वसूल करू शकलेला नाही, इतकी कमी कमाई झाली आहे. दुसरीकडे, ‘धाकड’सोबत रिलीज झालेल्या कार्तिक आर्यनच्या ‘भूलभुलैया २’ ला बॉलिवूड चित्रपटांच्या बाबतीत या वर्षातील आतापर्यंतचे सर्वांत मोठे ओपनिंग मिळाले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या