मुंबई, 25 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा (शेवटचा) चित्रपट ‘दिल बेचारा’ ऑनलाइन रिलीज होण्याची घोषणा झाली. हा चित्रपट ऑनलाईन नव्हे तर थिएटरमध्ये रिलीज करावा अशी मागणी त्याच्या चाहत्यांनी केली. तरी चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाणार आहे. मात्र तो फ्रीमध्ये पाहण्याची संधी त्याच्या चाहत्यांना देण्यात आली आहे.
24 जुलैला डिज्नी प्लस हॉटस्टारवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट सर्वांना पाहता येणार आहे. म्हणजे हा फक्त सस्क्राइबरच नाही तर नॉन सस्क्राइबर प्रेक्षकांनाही ही फिल्म पाहता येणार आहे. ज्यांच्याकडे डिज्नी प्लस हॉटस्टारचं सब्सक्रिप्शन नाही, त्यांनाही हा चित्रपट पाहता येणार आहे.
प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर आणि सुशांतचे मित्र मुकेश छाबडा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात सुशांतसह अभिनेत्री संजना सांघी आहे. संजनाचा हा पहिला चित्रपट आहे.मुकेश छाबडा यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे, “माझ्या पहिल्या दिग्दर्शित चित्रपटाचा सुशांत फक्त हिरो नाही, तर तो माझा खूप जवळचा मित्रही होता. माझ्या सुखदु:खात त्याने मला बरीच साथ दिली. ‘काय पो छे’ ते ‘दिल बेचारा’पर्यंत आम्ही एकमेकांच्या जवळ होतो. त्यामुळे अनेक स्वप्नं आम्ही एकत्र रंगवली, एकत्र पूर्ण केली. मात्र आता ते पाहण्यासाठी सुशांत नाही. त्याच्याशिवाय मला ही फिल्म रिलीज करावी लागेल असं मला वाटलंही नव्हतं”त्यांच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्यात. ज्यामध्ये त्यांनी सुशांतचा हा चित्रपट ऑनलाइन रिलीज करू नका, तर मोठ्या पडद्यावर रिलीज करा अशी मागणी केली आहे.
Read More फोनची फॉरेन्सिक तपासणी सुरू : सकाळी 9.30 वाजेपर्यंत सुशांत प्ले स्टेशनवर गेम खेळत होता