निराशजनक स्टेटस अपलोड : ‘क्राइम पेट्रोल’ फेम अभिनेत्रीची आत्महत्या

393

काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होती…’सर्वात वाईट असते ते म्हणजे तुमची स्वप्न मरून जाणे’.

इंदौर : गेल्या काही दिवसांपासून सिनेइंडस्ट्रीत एकानंतर एक कलाकारांच्या निधनाचे वृत्त समोर येत आहेत. त्यात आता छोट्या पडद्यावरील अभिनेत्री प्रेक्षा मेहता हिने गळफास लावून आत्महत्या केली आहे. तिने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिलेल्या पोस्टवरून स्पष्ट होत आहे.

आत्महत्येमागचं नेमके कारण समजू शकलेले नाही
क्राइम पेट्रोल फेम अभिनेत्री प्रेक्षा मेहता हिने तिच्या इंदौरमधील घरी गळफास घेत आत्महत्या केली. कोरोना व्हायरच्या लॉकडाऊनमध्ये प्रेक्षा तिच्या घरी आली होती. प्रेक्षाच्या आत्महत्येमागचं नेमके कारण समजू शकलेले नाही मात्र डिप्रेशनमुळे तिने आत्महत्या केल्याचे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. तिने आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या इन्स्टाग्राम स्टोरी एक निराशजनक पोस्ट लिहिली होती.

Read More  मेजर सुमन गावनी यांना युएनचा मिलिट्री जेंडर ऍडव्होकेट पुरस्कार

इन्स्टाग्राम स्टोरीवर एक निराशजनक स्टेटस अपलोड
प्रेक्षा आपल्या घरी परतल्यानंतर ती काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होती. सोमवारी रात्री ती जेव्हा तिच्या रुममध्ये गेली तेव्हा काही वेळ ती तिचा फोन वापरत राहिली. त्यानंतर तिनं इन्स्टाग्राम स्टोरीवर एक निराशजनक स्टेटस अपलोड केले होते. ज्यात तिनं लिहिलं, ‘सर्वात वाईट असते ते म्हणजे तुमची स्वप्न मरून जाणे’.

यापुढे काम मिळणार नाही या भावनेने ती डिप्रेशनमध्ये जात होती
सकाळी जेव्हा प्रेक्षाचे बाबा तिला उठवायला तिच्या रुममध्ये गेले त्यावेळी त्यांनी तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत पाहिला. त्यांनी तिला लगेच रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.प्रेक्षाला अभिनेत्री व्हायचे असल्यामुळे ती मुंबईत आली होती मात्र लॉकडाऊननंतर ती तिच्या घरी परतली. त्यानंतर लॉकडाऊन वाढत गेले आणि आता आपल्याला यापुढे काम मिळणार नाही या भावनेने ती डिप्रेशनमध्ये जात होती आणि डिप्रेशनमध्येच तिने हे धक्कादायक पाऊल उचलल्याचे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. दरम्यान पोलीस तपासात तिची कोणतीही सुसाइड नोट आढळून आली नाही.