23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeमनोरंजनघटस्फोटाच्या चर्चेस सिद्धार्थकडून पूर्णविराम

घटस्फोटाच्या चर्चेस सिद्धार्थकडून पूर्णविराम

एकमत ऑनलाईन

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सिद्धार्थ जाधव हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सिद्धार्थ आणि त्याची पत्नी तृप्ती यांची जोडी ही गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीमुळे चर्चेत होते.

पण ही अफवा असल्याचे सिद्धार्थने स्पष्ट केले. या सगळ्यात सिद्धार्थने त्याने सोशल मीडियावर त्याची लेक स्वराचा फोटो शेअर केल्याची पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सिद्धार्थ त्याची लेक स्वराचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. पण सगळ्यांचे लक्ष हे फोटोमध्ये असलेल्या सिद्धार्थची पत्नी तृप्तीने वेधले आहे.

घटस्फोटाच्या चर्चेत सिद्धार्थने हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत स्वराच्या वाढदिवसाला तुम्ही दिलेल्या शुभेच्छांबद्दल मनापासून आभार, लव्ह यू ऑल असे कॅप्शन दिले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या