मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम प्रत्येक मुद्यावर आपले मत मांडण्यासाठी ओळखली जाते. आपल्या ग्लॅमरस दुनियेमुळे बॉलिवूड नेहमीच चर्चेत असते. पण बॉलिवूडमध्ये एक असा चेहरा आहे जो या पार्ट्यांचा भाग बनत नाही. हा चेहरा म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम.
अलीकडेच यामी गौतमने वृत्तवाहिनीला मुलाखत दिली, कार्यक्रमात तिने चित्रपट पार्ट्यांपासून अंतर ठेवण्याचे कारण सांगितले. यामी गौतमने देखील बॉलिवूडबद्दल बरंच काही सांगितलं आहे. ती म्हणाली, ‘मला पार्ट्यांमध्ये जाणे कधीच आवडले नाही.
काम संपले की घरी परत येते.. मी अशा लोकांपैकी आहे.. मला वाटते की आयुष्यात कितीही पुढे गेले तरी चांगले काम करत राहायला हवे. पण तुमचे खरे व्यक्तिमत्त्व काय आहे.. यश तेच आहे जे तुम्ही स्वत:च्या बळावर, स्वत:च्या तत्त्वांवर तुम्हाला आनंदी बनवतं.’
ती पुढे म्हणाली, ‘ प्रत्येक प्रोफेशनमध्ये पार्ट्या असतात. पण इथे जे माझं फील्ड आहे, तिथे २ प्लस २ फोर नाही, इथे तुझ्या आयुष्याचा निर्णय, तुझ्या करिअरचा निर्णय दुस-याच्या हातात आहे, आणि कुठल्या ग्रुप्समध्ये मी दिसावी असा प्रकार मी कधीच केलेला नाही.