27.4 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeमनोरंजनटेलिव्हिजनला कमी लेखू नका शशांक केतकरने सुनावलेच...

टेलिव्हिजनला कमी लेखू नका शशांक केतकरने सुनावलेच…

एकमत ऑनलाईन

मुंबई : ‘होणार सून मी या घरची’, ‘हे मन बावरे’, ‘पाहिले न मी तुला’ यांसारख्या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेला अभिनेता शशांक केतकर अभिनयासोबतच सामाजिक, राजकीय विषयावर देखील भाष्य करत असतो. यावरून अनेकदा त्याला ट्रोल देखील केले आहे. परंतु त्याने कायमच आपली भूमिका ही परखडपणे मांडली आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने मुंबईतील खड्ड्यांवरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनाही चांगलेच सुनावले होते. त्याला काही दिवस होत असतानाच शशांकने पुन्हा एक पोस्ट केली आहे. या पोस्टमुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. त्याच्या ‘मुरांबा’ सिरियलचे २०० भाग पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्याने ही पोस्ट लिहिली आहे.

सध्या शशांकची ‘मुरांबा’ ही मालिका चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेत शशांक अक्षयची भूमिका साकारत आहे. अक्षय आणि रमाच्या या आंबट-गोड लव्हस्टोरीचे २०० भाग नुकतेच पूर्ण झाले. त्या निमित्ताने शशांकने खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट अनेकांच्या टीकेला उत्तर देणारी आहे. अनेकजण मालिका विश्वाला कमी लेखतात, टीका करतात. त्यांच्यासाठी ही पोस्ट म्हणजे सडेतोड उत्तरच आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या