23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeमनोरंजनउत्तर प्रदेशात घराघरांत जाऊन आमिरविरोधात प्रचार

उत्तर प्रदेशात घराघरांत जाऊन आमिरविरोधात प्रचार

एकमत ऑनलाईन

मुंबई : आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ सिनेमा ११ ऑगस्ट रोजी रिलीज झाला आहे. सिनेमा रिलीजच्या आधीपासूनच वादात पडला होता. सोशल मीडियावर सिनेमाला बॉयकॉट करण्याची मागणी केली गेली होती. पण आता नव्याने काही हिंदू संघटनांनी सिनेमाला विरोध करायला सुरुवात केली आहे.

वाराणसीच्या आयपी विजया मॉलच्या बाहेर सनातन रक्षक सेनाने आमिर खान आणि त्याच्या ‘लाल सिंग चड्ढा’ सिनेमाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. संघटनेने उत्तर प्रदेशात सिनेमावर बंदीची मागणी केली आहे आणि आमिर खानवर हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याचा आरोपही केला आहे.

सनातन रक्षक सेनाच्या युथ विभागाचे अध्यक्ष चंद्र प्रकाश सिंग आणि उपाध्यक्ष अरुण पांडेने आरोप केला आहे की, आमिर खानने ना केवळ हिंदू देवतांचा अपमान केला आहे तर त्याने सनातन धर्माचा देखील विरोध केला आहे. ते म्हणाले, आम्ही घराघरांत जाऊन अपील करू की आमिर खानच्या सिनेमाला बॉयकॉट करा. त्यासोबतच, आम्ही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडेही सिनेमावर बंदी आणण्याची मागणी करणार आहोत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या