मुंबई : बॉलिवूडची ‘ड्रामाक्वीन’ राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून आदिल खान दुर्रानीमुळे चर्चेत आहे. दररोज पतीविरोधात ती नव-नवे खुलासे करत आहे. पण आता रडत बसण्यापेक्षा तिने करिअरकडे लक्ष देण्याचा विचार केला आहे. त्यादृष्टीने पाऊल उचलत तिने आता अभिनयाची कार्यशाळा सुरु केली आहे.
‘ड्रामाक्वीन’ राखी सावंतने दुबईत अभिनयाची कार्यशाळा सुरु केली आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून राखी नवोदित कलाकारांना तसेच अभिनय क्षेत्रात येऊ पाहणा-या मंडळींना अभिनयाचे धडे देणार आहे. तसेच त्यांच्यासाठी बॉलिवूडचं दार खुलं करणार आहे.
राखी म्हणाली की, मी अभिनयाची कार्यशाळा सुरु केली असून या कार्यशाळेच्या माध्यमातून मी दुस-या देशातील अभिनयाची आवड असलेल्या मंडळींना अभिनयाचे प्रशिक्षण देऊन त्यांना बॉलिवूडमध्ये काम मिळवून देणार आहे. राखी सावंतचा नवा म्युझिक व्हिडीओ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.