26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमनोरंजनमद्यधुंद अवस्थेत पूनम पांडेकडून रेस्टॉरंटमध्ये तोडफोड

मद्यधुंद अवस्थेत पूनम पांडेकडून रेस्टॉरंटमध्ये तोडफोड

एकमत ऑनलाईन

मुंबई : अभिनेत्री पूनम पांडे ही तिच्या बोल्ड ग्लॅमरस स्टाइलसाठी ओळखली जाते. ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करत असते. नुकताच पूनमचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत पूनम रात्री उशिरा पर्यंत पार्टी करताना दिसत आहे. नशेमध्ये धुंद असलेली पूनम ग्रीस स्टाईलमध्ये अनेक प्लेट्स तोडताना दिसत आहे.

दरम्यान या व्हिडीओमध्ये पूनमचे हे कृत्य पाहून नेटकरी तिच्यावर संतापले असून तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे. आपल्या बोल्डनेसमुळे लोकांना घायाळ करणारी पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पूनम पांडेचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पूनम रेस्टॉरंटमध्ये असल्याचे दिसते. यावेळी रेस्टॉरंटमध्ये पूनमनं एका वेगळ्या प्रकारे मज्जा केल्याचे दिसत आहे.

पूनमचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हुम्पलाने शेअर केला आहे. या व्हिडीओत पूनम वेगळ्या अंदाजात मस्ती करताना दिसत आहे. या व्हिडीओत पूनम ग्रीस स्टाईलमध्ये अनेक प्लेट्स तोडताना दिसत आहे. पूनमचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दुसरीकडे, काही नेटकरी पूनमला पुन्हा एकदा टार्गेट करताना दिसत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या