जुनैद एवढा हुबेहूब दिसत होता की खुद्द ऋषी कपूर देखील त्याचा फोटो पाहून अचंबित झाले होते
मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याच्यासारख्या हुबेहूब दिसणाऱ्या जुनैद शाह याचा मृत्यू झाला आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्याचा वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी मृत्यू झाला. जुनैद हा जम्मू-कश्मीर येथील रहिवासी होता आणि तेथील एका पत्रकाराने ट्विट करून त्याच्या मृत्यूची माहिती दिली. जुनैद एवढा हुबेहूब दिसत होता की खुद्द ऋषी कपूर देखील त्याचा फोटो पाहून अचंबित झाले होते.
हुबेहूब दिसणारा एक मुलगाही
रणबीर आणि जुनैद याचा एकसाथ फोटो पाहून ऋषी कपूर देखील कन्फ्युज झाले होते. हा फोटो त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट देखील केला होता. याखाली त्यांनी , ‘माझा मुलासारखा हुबेहूब दिसणारा एक मुलगाही असून खरे सांगतो दोघांमध्ये मला खरा-खोटा असा फरक जाणवत नसल्याचे’, कॅप्शन त्यांनी दिले होते.
सोशल मीडियावर त्याला मजबूत फॉलोअर्स होते
रणबीर कपूर याच्यासारख्या दिसत असल्याने जुनैद चांगलाच प्रसिध्द झाला होता. सोशल मीडियावर त्याला मजबूत फॉलोअर्स होते. इन्स्टाग्रामवर त्याचे शेकडो फोटो आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्या कपड्यांची चॉईस, हेअरस्टाईल आणि चेहरा देखील हुबेहूब रणबीरसारखा दिसत होता.
मुंबईत तो मॉडेलिंग करत होता; कोणताही आजार नव्हता
जुनैद याला कोणताही आजार नव्हता. काही महिन्यांपूर्वी तो आपल्या आई-वडिलांसह मुंबईवरून जम्मू-कश्मीरला परतला होता. मुंबईत तो मॉडेलिंग करत होता आणि अभिनेते अनुपम खेर यांच्या मॉडेलिंग स्कुलमध्ये याचे धडे गिरवत होता.
Read More एसटी महामंडळाने 10 हजार कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित केली