Saturday, September 23, 2023

‘जवान’च्या रिलीजनंतरही तारासिंग जोमात!

मुंबई : बॉलिवूडला आता अच्छे दिन आले आहेत असे म्हणायला हरकत नाही. सनी देओल आणि शाहरुख खान यांनी तर बॉक्सऑफिसवर धुमाकुळच घातला आहे. सनीच्या ‘गदर २’ आणि शाहरुखच्या ‘जवान’ ने नवे रेकॉर्ड रचलेत. तर या दोन दिग्गज अभिनेत्यांमध्येही स्पर्धा लागली आहे. यामध्ये शाहरुखचा ‘जवान’ही तारासिंगला हरवू शकत नाही.

११ ऑगस्ट रोजी सनी देओलचा ‘गदर २’ रिलीज झाला. सिनेमाला रिलीज होऊन ३८ दिवस उलटून गेले आहेत. तरी ‘गदर २’ची घौडदौड अजूनही सुरुच आहे. काल रविवारी सिनेमाने पुन्हा कोटींची कमाई केली. ‘गदर २’ ने ३७ व्या दिवशी ७१ लाख तर काल रविवारी सुट्टीच्या दिवशी १ कोटीची कमाई केली. जिथे शाहरुखचा ‘जवान’ स्पर्धेत आला असतानाही तारांिसगला काहीच फरक पडलेला नाही. बड्या बजेटचे सिनेमेही आजकाल महिनाभर टिकत नाही तर तिथे ‘गदर २’ आणि ‘जवान’ मात्र अपवाद ठरत आहेत.

‘गदर २’ ने आतापर्यंत ५१९ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे एकूण कमाईत ‘गदर २’ अजूनही शाहरुखच्या ‘जवान’च्या पुढेच आहे. ‘जवान’च्या रिलीजनंतर गदरच्या मेकर्सने शक्कल लढवत तिकीटांचा दर कमी केला होता. याचा फायदा सिनेमाला झाला. ‘जवान’च्या रिलीजनंतर ‘गदर २’च्या कमाईत घट होत होती. मात्र मेकर्सच्या या स्ट्रॅटेजीने ती भरुन निघाली.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या