26.4 C
Latur
Friday, May 20, 2022
Homeमनोरंजनखळबळजनक :दुस-या प्रयत्नात सुशांतने घेतला गळफास

खळबळजनक :दुस-या प्रयत्नात सुशांतने घेतला गळफास

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याच्या मृत्यूच्या कारणाबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्याचं असं अचानक निघून जाणं सर्वांसाठी धक्कादायक होतं. सुशांतच्या पोस्ट मार्टम अहवालात त्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले होते. मात्र पोलिसांनी खोलात जाऊन तपास केल्यावर काही नवीन बाबी समोर आल्या आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार सुशांत सिंह राजपूतने ज्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती, तिथे जमिनीवर बाथरोबचे तुकडे मिळाले आहेत. पोलिसांना असा संशय आहे की, त्यांनी पहिल्यांदा आत्महत्येचा प्रयत्न केला पण तो असफल ठरला. पोलिसांना असा संशय आहे की बाथरुममध्ये ठेवण्यात आलेल्या बाथरोबचा त्याने गळफास लावण्यासाठी वापर केला, मात्र तो बाथरोब तुटला. त्यामुळे आत्महत्येचा त्याचा प्रयत्न असफल ठरला.

हिरव्या रंगाचा कुर्ता देखील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला

सुशांतच्या खोलीतील कपाटातील कपडे देखील अस्तावेस्त आढळून आले होते. त्यामुळेच पोलिसांना असा संशय आहे की, बाथरोब तुटल्यानंतर दुसरे कापड शोधण्यासाठी सुशांतने कपाट शोधलं. त्यावेळी त्याला हिरवा कुर्ती सापडला, ज्याच्या साहाय्याने त्याने गळफास घेऊन आयुष्य संपवले होते. सूत्रांच्या माहितीनुसार जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले होते, त्यावेळी सुशांतची बहिण आणि खोलीमध्ये उपस्थित लोकांनी मिळून तो कुर्ता कापला होता आणि सुशांतच्या मृतदेहाला खाली उतरवले होते. पोलिसांनी हा हिरव्या रंगाचा कुर्ता देखील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला आहे. जेणेकरून याबाबत माहिती मिळवता येईल की, त्यामध्ये एका व्यक्तीचे वजन उचलण्याची क्षमता होती की नाही.

हरहुन्नरी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने 14 जून रोजी त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. याबाबतची माहिती त्याच्या नोकरांनी पोलिसांना कळवली होती. पोस्टमार्टम अहवालानुसार सुशांतने आत्महत्या केल्याचे समोर आले होते. दरम्यान त्याच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर लोकांनी त्यांच्या नैराश्यास नेपोटिझम जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.

Read More  पुण्याची सीरम इन्स्टिट्यूटऑक्सफोर्डच्या कोरोना लसीचे लाखो डोस बनविणार

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या