22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeमनोरंजन‘टकाटक २’चा धमाकेदार टिझर रसिकांच्या भेटीला!

‘टकाटक २’चा धमाकेदार टिझर रसिकांच्या भेटीला!

एकमत ऑनलाईन

मुुंंबई : काही चित्रपट केवळ बॉक्स ऑफिसवर छाप सोडण्यासोबतच रसिकांच्या मनावरही आपला ठसा उमटवण्यात यशस्वी होतात. अशांपैकीच एक आहे ‘टकाटक’. पहिल्या चित्रपटाला रसिकांचा तूफान प्रतिसाद लाभल्याने ‘टकाटक २’च्या रूपात या चित्रपटाचा पुढील भाग १८ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मोशन पोस्टरनंतर आता ‘टकाटक २’चा टिझरही लाँच करण्यात आला आहे.

‘टकाटक २’चं लेखन-दिग्दर्शन मिलिंद कवडे यांनी केले आहे. अ‍ॅडल्ट कॉमेडीच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत एक महत्त्वपूर्ण संदेश पोहोचवण्याचा नवा ट्रेंड त्यांनी ‘टकाटक’च्या माध्यमातून सुरू केला आहे. ‘टकाटक २’मध्ये याचा पुढील टप्पा पहायला मिळणार आहे. आपला हात जगन्नाथ करत इथवर पोहोचलेला ठोक्या आता त्याची हातगाडी पुढे ढकलण्याच्या विचारात असल्याचे ‘टकाटक २’च्या टिझरमध्ये पहायला मिळतं. ‘अव्हर ठोक्या इज बॅक’ असे म्हणत ‘टकाटक २’मध्ये ठोक्या आपला पुढचा अध्याय लिहिताना दिसणार असल्याचे संकेत टिझर देतो.

मागच्या वेळेप्रमाणे या वेळीही त्याच्या जोडीला त्याचे फ्रेंड्स प्रणाली भालेराव, अजिंक्य राऊत, अक्षय केळकर, भूमिका कदम, कोमल बोडखे, सुशांत दिवेकर असतील. या चित्रपटात स्वप्नील राजशेखर, किरण माने, पंकज विष्णू, किरण बेरड, आरजे महेश काळे, स्मिता डोंगरे आदी कलाकारही वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

‘टकाटक २’ची मूळ संकल्पना मिलिंद कवडे यांचीच असून, कथा-पटकथाही त्यांनीच लिहिली आहे. संवादलेखक किरण बेरड आणि संजय नवगिरे यांनी खुमासदार शैलीत संवादलेखन केले आहे. जय अत्रेने लिहिलेल्या गीतांना संगीतकार वरुण लिखतेने संगीतसाज चढवला आहे. डीओपी हजरत शेख वली यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून पार्श्वसंगीत देण्याचे काम अभिनय जगताप यांनी केले आहे. या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते निलेश गुंडाळे आहेत.

‘टकाटक २’ निर्मिती रिलायन्स एंटरटेन्मेंट स्टुडिओने, पर्पल बुल एंटरटेन्मेंटच्या सहयोगाने केली असून ओमप्रकाश भट्ट, रिलायन्स एंटरटेन्मेंट स्टुडिओ, नरेश चौधरी, आदित्य जोशी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. मिलिंद कवडे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. १८ ऑगस्ट २०२२ रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या