टोकाचं पाऊल : टीव्ही स्टार मनमीत ग्रेवालची गळफास घेऊन आत्महत्या

218

लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडला होता : घराचं भाडं देणंही कठीण झालं होतं

मुंबई : हिंदी टीव्ही स्टार मनमीत ग्रेवाल याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. 32 वर्षीय मनमीत ग्रेवाल हा लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडला होता. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ते डिप्रेशनमध्ये होता. कर्जात बुडाल्याने त्याने हे टोकाचं पाऊल उचललं आहे.

टीव्हीवरील ‘आदत से मजबूर’ आणि ‘कुलदीपक’ मालिकेत काम केलं
नवी मुंबईतील खारघर परिसरातील एका छोट्याश्या फ्लॅटमध्ये मनमीत ग्रेवाल त्याच्या पत्नीसोबत राहत होता. याच फ्लॅटमध्ये शुक्रवारी (15 मे) रात्री जवळपास साडे दहाच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली.मनमीत ग्रेवाल याने सब टीव्हीवरील ‘आदत से मजबूर’ आणि ‘कुलदीपक’ मालिकेत काम केलं आहे.

Read More  कोरोनाच्या पाठोपाठ परभणी जिल्ह्यातही सारीचा शिरकाव

आर्थिक अडचणीमुळे तो तणावाखाली
मनमीत ग्रेवाल हा लॉकडाऊनमुळे चिंतेत होता. त्याच्यावर आधीपासूनच कर्ज होतं. आर्थिक अडचणीमुळे तो तणावाखाली होता. त्यातच लॉकडाऊन घोषित झाल्याने पैसे येणंही बंद झालं होतं. लॉकडाऊनमध्ये काम मिळत नसल्याने तो तणावाखाली होता. त्याच्याकडे घर भाडं द्यायलाही पैसे नव्हते. त्यामुळे त्याने आपलं जीवन संपवल्याची माहिती आहे.

हिंदी मालिकांमध्ये काम करायचा मनमीत ग्रेवाल
मनमीत ग्रेवाल हा हिंदी मालिकांमध्ये काम करायचा. शिवाय, त्याने अनेक जाहिरातीही केल्या आहेत. सध्या तो 8 एपिसोड असलेल्या एका वेब सीरीजमध्ये काम करत होता. यापैकी तीन एपिसोड्समध्ये तो दिसणार होता.