24 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमनोरंजनप्रसिद्ध अभिनेत्री केट विन्सलेट रुग्णालयात; शूटिंगदरम्यान दुखापत

प्रसिद्ध अभिनेत्री केट विन्सलेट रुग्णालयात; शूटिंगदरम्यान दुखापत

एकमत ऑनलाईन

मुंंबई : हॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींमध्ये केट विन्सलेटच्या नावाचा समावेश होतो. केट सध्या क्रोएशियामध्ये तिच्या आगामी सिनेमाचे शूटिंग करत होती. ड्रामा पीरियड फिल्म ‘ली’ च्या सेटवर केट जखमी झाली असून तिला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. याठिकाणी घसरून पडल्याने केटला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.

‘टायटॅनिक’ फेम केटला खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नसल्याचेही अपडेट समोर आले आहे. मीडिया रिपोर्टस्नुसार तिचे शूटिंग याच आठवड्यात ती पुन्हा सुरू करणार आहे. एका इंग्रजी मनोरंजन वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, ‘केट घसरली असून प्रोडक्शन टीमकडून आवश्यक असलेली खबरदारी म्हणून तिला रुग्णालयात नेण्यात आले. ती ठीक आहे आणि या आठवड्यात नियोजित वेळेप्रमाणे चित्रीकरण करणार आहे.’

आगामी फीचर फिल्ममध्ये, विन्सलेट ली मिलर ही भूमिका साकारत आहे. ली ही वोग कव्हर मॉडेल असते, जी फोटोग्राफर बनते. ली यांनी दुस-या महायुद्धावेळी पत्रकार म्हणून काम पाहिले होते. केटच्या दुखापतीमुळे ‘ली’ या ऐतिहासिक ड्रामा पीरियड फिल्मचे शूटिंग थांबवण्यात आले होते. पण समोर आलेल्या अपडेटनुसार पुन्हा एकदा नियोजनाप्रमाणे हे शूटिंग सुरू केले जाईल.

केटने १९९७ साली आलेला हॉलिवूडचा सर्वांत लोकप्रिय चित्रपट टायटॅनिकमध्ये आपल्या दमदार अभिनयाने सर्वांची मने जिंकली होती. या चित्रपटासाठी केट विन्सलेटला ऑस्करसाठी नामांकन मिळाले होते. ४६ वर्षीय केटला २००९ साली आलेल्या ‘द रीडर’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या