34.2 C
Latur
Thursday, June 1, 2023
Homeमनोरंजनकोरोना व्हायरसवर आधारित रामगोपाल वर्मांनी बनवला चित्रपट

कोरोना व्हायरसवर आधारित रामगोपाल वर्मांनी बनवला चित्रपट

एकमत ऑनलाईन

कोरोना व्हायरसवरील पहिला चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज

कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. सर्वांनी घरीच राहावे, असे आवाहन सरकारने केले आहे. लॉकडाऊनमध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीत शूटिंगही ठप्प झाली आहे. याबरोबरच सोशल डिस्टेन्सिंगचे पालन करण्यास देखील सांगण्यात येत आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने सोशल डिस्टेन्सिंगचे पालन करत सोमवारी शूटिंग सुरू केली. यासह दिग्दर्शक राम गोपाल वर्मा देखील एका चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. त्यांनी ‘कोरोना व्हायरस’ वर आधारित चित्रपट तयार केला असून या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित केला आहे. या तेलगू चित्रपटाचे नाव कोरोना व्हायरस असून कोरोना व्हायरसवरील पहिला चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे.

राम गोपाल वर्मा यांनी आपल्या सुप्रसिद्ध शैलीत ट्विट करत म्हटले आहे की, कोरोना व्हायरस चित्रपटाचा ट्रेलर येथे आहे. या कथेच्या पार्श्वभूमी लॉकडाऊन असून या चित्रपटाचे शूट देखील लॉकडाऊनमध्ये झाले आहे. मला हे सिद्ध करायचे होते की, कोणीही आपले काम थांबवू शकत नाही, ना देव किंवा हा जीवघेणा कोरोना.

Read More  लातूर जिल्ह्यातील ५९ रुग्ण ठणठणीत बरे

असा आहे ट्रेलर
या ट्रेलरमध्ये एका कुटुंबाची कहाणी दाखवण्यात आली आहे. ट्रेलरमध्ये असे दिसून येते की, बातम्यांपासून ते सोशल मीडियापर्यंत फक्त भितीदायक कोरोनाच्याच बातम्या दिसताय. जेव्हा घरातल्या मुलीलाच खोकला होतो, तेव्हा या चित्रपटात ट्विस्ट निर्माण होतो. यानंतर या कुटुंबियांच्या मनात शंकेची पाल चुकचुकते आणि या मुलीची कोरोना टेस्ट करावी की नाही, या विचारात ते पडतात.

चित्रपटाची कथा भीती आणि संभ्रम या भोवती फिरताना दिसते. रामगोपाल वर्मा यांनी हॉरर ड्रामा फिल्म बनवायचे आहे, असेच या चित्रपटाच्या ट्रेलरवरून दिसतेय. राम गोपाल वर्माची ट्रेडमार्क शैली या चित्रपटात बघायला मिळते. या चित्रपटात श्रीकांत मुख्य भूमिकेत असून या चित्रपटाची निर्मिती सीएम क्रिएशन्सने केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या