चित्रपट निर्माते अनिल सुरी यांचे निधन

397

मुंबई: कर्मयोगी, बेगुनाह आणि राज तिलक या चित्रपटांचे निर्माते अनिल सूरी यांचे आज निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
चित्रपट निर्माते राजिव सूरी यांनी भाऊ अनिल सूरी यांच्या निधनाची माहिती दिली. राजीव यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून अनिल यांना ताप येत होता. तसेच त्यांना श्वास घेण्यासही त्रास होत होता.

Read More  फोटो ट्रांसफर करण्यासाठी फेसबुकने आणले खास टूल

अनिल यांना २ जून रोजी ताप आला होता. दुस-या दिवशी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांची तब्बेत खालावली. त्यांना तातडीने लिलावती आणि त्यानंतर हिंदुजा रुग्णालयात हलवण्यात दाखल करण्यात आले, अशी माहिती राजीव यांनी दिली. पुढे ते म्हणाले की, मोठ्या रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्यामुळे त्यांना बुधवारी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. गुरुवारी त्यांना जास्त त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना वेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.