हे कसे शक्य आहे? प्रश्न विचारला जात आहे की जो माणूस गेम खेळत होता, तो नैराश्याने आत्महत्या कशी काय करेल?
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने 14 जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येच्या वृत्ताने त्याच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. अनेकजण सोशल मीडियावर त्याच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत तर दुसरीकडे सोशल मीडियावर बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या विरोधात वाद पेटल्याचे पहायला मिळत आहे. सुशांतचे काही जुने फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
जो माणूस गेम खेळत होता, तो नैराश्याने आत्महत्या कशी काय करेल?
नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हॉट्सअॅपवरून देखील हा व्हिडिओ फॉरवर्ड केला जात आहे. या व्हिडिओतून असा दावा केला जात आहे की, 14 जून रोजी सकाळी 9.30 वाजेपर्यंत सुशांत प्ले स्टेशनवर गेम खेळत होता.या व्हिडिओच्या माध्यमातून असा प्रश्न विचारला जात आहे की, जो माणूस गेम खेळत होता, तो नैराश्याने आत्महत्या कशी काय करेल? हे कसे शक्य आहे? असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर विचारण्यात येत आहेत.
सुशांतच्या फोनची फॉरेन्सिक तपासणी सुरू
या व्हिडिओमध्ये दावा करण्यात येणारा प्लेस्टेशन आयडी खरोखर सुशांतचा आहे का, याची तपासणी पोलिसांकडून केली जात आहे. त्याचप्रमाणे पोलिसांचे असे म्हणणे आहे की सुशांतच्या फोनची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. ज्यामध्ये या दाव्यांचा खुलासा होईल. मात्र सुशांतच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे आणि त्याबरोबर सुशांतचा खून करण्यात आला असा आरोप त्याचे चाहते करत आहेत.
As per the records in PlayStation's official app, #SushantSinghRajput was active till 9:35 AM or later on 14 June 2020. He was playing Call of Duty: Modern Warfare. This means, he was not in a depression. Link: https://t.co/N8EwALTSSL#BeFairInSSRMurderCase #CBIEnquiryForSushant
— Shashank Rayal 🇮🇳 (@shashankrayal) June 21, 2020
शरीरावर कोणताही संघर्ष किंवा दुखापतींचा निशान सापडलेले नाहीत
दरम्यान नुकत्याच आलेल्या सुशांतच्या पोस्ट मार्टम रिपोर्टनुसार त्याचा मृत्यू गळफास घेतल्यानेच झाल्याचे डॉक्टरांच्या टीमकडून स्पष्ट करण्यात आले आहे. रिपोर्टनुसार, पोस्टमॉर्टमनुसार सुशांतच्या शरीरावर कोणताही संघर्ष किंवा दुखापतींचा निशान सापडलेले नाहीत. त्याच्या मृत्यूचे कारण गळफास घेतल्यामुळे गुदमरल्याने झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्याची नखेही स्वच्छ आढळली आहेत. रिपोर्टमध्ये हे स्पष्ट करण्यात आले आहे की सुशांतच्या मृत्यूचे कारण आत्महत्या आहे. मुंबई पोलिसांनी सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याचे वडील, बहिणी, नोकर, मॅनेजर, रिया चक्रवर्तीसह अनेकांचा जबाब नोंदवून घेतला आहे.
Read More पीएम केअर्स फंडातून 50 हजार व्हेंटिलेटर्स