21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमनोरंजनमाजी ‘मिस वर्ल्ड’ हरनाज कौर संधू अडचणीत

माजी ‘मिस वर्ल्ड’ हरनाज कौर संधू अडचणीत

एकमत ऑनलाईन

मुंबई : माजी ‘मिस युनिव्हर्स’ हरनाज कौर संधूविरुद्ध चंदीगड जिल्हा न्यायालयात केस दाखल करण्यात आली आहे. ‘द कपिल शर्मा शो’ फेम अभिनेत्री उपासना सिंह हिने हरनाजविरोधात दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उपासन सिंह हिने गुरुवारी वकिलांमार्फत ही केस दाखल केली आहे.

उपासनाने हरनाजवर आरोप करताना म्हटले की, ती एका चित्रपटाची निर्मिती करत होती, ज्यामध्ये हरनाजने काम करण्यास होकार दिला होता. यानंतर, चित्रपट पूर्ण झाल्यानंतर ती प्रमोशनसाठी कधीही आली नाही आणि आता तिने फोन उचलणे देखील बंद केले आहे. तिच्याकडे हरनाजविरोधात काही पुरावे देखील आहेत. आता न्यायालयाकडून हरनाजला समन्स बजावण्यात येणार आहे.

अभिनेत्री उपासना सिंह पंजाबी चित्रपटांमध्येही काम करते आणि पंजाबी चित्रपटांची निर्मिती देखील करते. हरनाज कौर संधू ही उपासना सिंह दिग्दर्शित ‘बाईजी कुट्टन गई’ या पंजाबी चित्रपटाची अभिनेत्री आहे. याच चित्रपटाच्या संदर्भात ही केस दाखल करण्यात आली आहे. उपासना सिंह यांनी याबाबत हरनाज कौरवर गंभीर आरोप केले आहेत.

उपासना सिंहने तिचे वकील करण सचदेवा यांच्यामार्फत ‘मिस युनिव्हर्स’विरोधात कोर्टात ही याचिका दाखल केली असून, यात कराराचा भंग आणि नुकसानीचा दावा दाखल केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या