मुंबई : सध्या बॉलिवूडच्या चित्रपटांबाबत खूप वाद सुरु आहेत. शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटामुळे राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलेले आहे. अशातच सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी हे ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत.
दरम्यान ८० दशकातील सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते राजकुमार संतोषी आता तब्बल ९ वर्षांनी बॉलिवूडमध्ये नव्या को-या चित्रपटासह पदार्पण करणार आहेत.
नुकतंच या चित्रपटाची घोषणा झाली असून सोशल मीडियावर याची चांगलीच चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे. गांधी विरुद्ध गोडसे या विचारधारेमधील युद्ध आपण बघत आलो आहोत. ब-याच कलाकृतीमधून यावर भाष्यदेखील करण्यात आले आहे. शिवाय महात्मा गांधी यांच्यावरदेखील बरेच चित्रपट बनले.
आता याच २ विचारधारांमधील युद्ध पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. राजकुमार संतोषी यांनी नुकतीच आपल्या चित्रपटाची घोषणा केली असून त्याची रिलीज डेटही जाहीर केली आहे. या चित्रपटाच्या स्टारकास्ट बाबत मात्र अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. हेही ‘गांधी गोडसे एक युद्ध’ मध्ये महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे या दोन विरोधी विचारसरणींमधील युद्ध दाखवण्यात आले आहे.
या चित्रपटाची घोषणा करण्यासाठी निर्मात्यांनी नुकताच एक व्हिडिओ जारी केला आहे. या चित्रपटात ऑस्कर आणि ग्रॅमी विजेते संगीतकार ए.आर. रहमान यांचे संगीत असेल. संतोषी प्रॉडक्शन मनिला संतोषी निर्मित, हा चित्रपट आहे.