मुंबई: अभिनेत्री आलिया भट्ट गंगूबाईच्या रुपात मोठ्या पडद्यावर लवकरच दिसणार आहे. गंगूबाई काठीयावाडी हा तिचा चित्रपट रुपेरी पडद्यावर येतोय. भूमिकेतला तिचा लूक देखील समोर आला होता.पण हा चित्रपट आता वादाच्या भोव-यात अडकला आहे. त्यामुळं चित्रपटाचं शूटिंग देखील थांबवलं जाण्याची शक्यता आहे.
संजय लीला भन्साळी यांनी लॉकडाउनपूर्वी गंगूबाई कठियावाडी; या चित्रपटातची घोषणा केली होती.कामाठीपुरामधल्या देहविक्रय करणा-या महिलांच्या वस्तीत दंतकथा बनून राहिल्या त्या गंगूबाई चित्रपटाच्या निमित्ताने सर्वांच्या समोर येणार आहेत. पण गंगूबाई यांच्या कुटुंबियांनी या चित्रपटाच्या कथेवर आक्षेप घेतला आहे. त्यांच्या कुटुंबियांकडून मुंबई शहर दिवाणी न्यायालयात हुसैन जैदी, संजय लीला भन्साळी आणि आलिया भट्ट यांच्या विरोधात २२ डिसेंबरला खटला दाखल करण्यात आला आहे. तसंच या प्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी ७ जानेवारी २०२१ पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे.
संजय लीला भन्साळींचा हा चित्रपट हुसैन जैदी यांनी लिहिलेल्या माफिया क्वीन ऑफ मुंबई पुस्तकातील गंगूबाई काठियावाडी यांच्यावर लिहिलेल्या एका भागावर आधारित आहे. यापूर्वी हा चित्रपट ११ सप्टेंबरला प्रदर्शित होणार होता, परंतु सद्य परिस्थिती पाहता या वर्षी हा चित्रपट पूर्ण होण्याच्या शक्यता कमी आहेत.
इस्रायलीमध्ये पुन्हा निवडणुक होणार