मुंबई : आपल्याला माहीत आहे की नागराज मंजुळे काहीतरी भन्नाट करत असतात. आताही ‘घर बंदूक बिरयानी’ हा एक आगळा चित्रपट घेऊन झी स्टुडिओज आणि नागराज मंजुळे सज्ज झाले आहेत. येत्या ७ एप्रिल रोजी ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार असून सयाजी शिंदे, आकाश ठोसर आणि नागराज मंजुळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
काही महिन्यांपूर्वीच हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित ‘घर बंदूक बिरयानी’या चित्रपटाचे टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. एकाच वेळी मराठी, हिंदी, तामीळ आणि तेलुगु भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
काही महिन्यांपूर्वीच हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटाचे टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. पोलीस आणि डाकू यांच्यातील चकमक यात दिसत होती. हे नेमकं काय प्रकरण आहे, हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता लागलेली असतानाच आता या चित्रपटाचे एक नवीन पोस्टर झळकले आहे.
यात चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. ‘झी’ स्टुडिओज आणि नागराज मंजुळे यांनी यापूर्वी एकत्र येऊन ‘फॅण्ड्री’, ‘सैराट’, ‘नाळ’ यांसारखे सुपरहिट चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिले आहेत.