28.5 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeमनोरंजनगझनीचा स्किवेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

गझनीचा स्किवेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

एकमत ऑनलाईन

मुंबई : गझनी सिनेमाच्या सिक्वेलची जोरदार तयारी सध्या सुरु आहे. तामिळ सिनेमाचे प्रसिद्ध दिग्दर्शक ए.आर. मुर्गदास यांनी इशारा दिला आहे. की २००५ मधील सुपरहिट तामिळ सिनेमाच्या सिक्वेलची तयारी ते सध्या करत आहेत. तामिळ मध्ये बनलेल्या २००५ मधील ‘गझनी’ सिनेमात सूर्या,आसिन आणि नयनतारा मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर बरोबर ३ वर्षांनी म्हणजे २००८ मध्ये मुर्गदास यांनी आपल्या या सिनेमाचा हिंदीत रिमेक केला. ज्यात आमिर खान,आसिन आणि जिया खान लीडमध्ये होते.

दोन्ही भाषांमध्ये हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. ंिहदीत तर १०० करोड या सिनेमानेकमावले होते. तब्बल ३ वर्षांच्या ब्रेकनंतर एआर मुर्गदास दिग्दर्शनमध्ये परततायत आणि चर्चा आहे की त्यांनी ‘गझनी २’ ची निवड आपल्या दमदार एन्ट्रीसाठी केली आहे. पण यावेळेस केवळ हिंदीत सिनेमाचा रीमेक करण्याऐवजी मुर्गदास सिनेमाला एकाच वेळेस

तेलुगु,हिंदी,मल्याळम,कन्नड भाषांमध्ये रिलीज करणार आहेत.
सूर्या नेहमीच मुर्गदास यांचा फेव्हरेट अभिनेता राहिला आहे. पण आमिरने देखील २००८ साली रिलीज झालेल्या गझनीच्या रीमेकमध्ये प्रचंड मेहनत घेतली होती. दोन्ही सिनेमांचे लेखन आणि दिग्दर्शन मुर्गदास यांनी केले होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या