मुंबई : दोन दिवसांपूर्वी सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांच्या अफेअरची बातमी आली..अफेअरच्या बातमीवर सगळ्यांनीच सुष्मिता सेनला चांगलेच ट्रोल केल्याचे पाहायला मिळाले. ‘ नेहमी मुलींनाच टार्गेट केले जाते’ असे म्हणत सुष्मिताची वहिनी चारु असोपाने सुष्मिताची बाजु घेत ट्रोलर्सना चांगलेच सुनावले आहे.
अनेकांनी सुष्मिताला ‘गोल्ड डिगर’ (संधीसाधू) म्हणत, ती पैशांसाठी ललित मोदींच्या प्रेमात पडल्याचा आरोप केला. या बातम्यांवर सुष चांगलीच संतापली असून भलीमोठी पोस्ट शेअर करत तिने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे. सुष्मितानंतर आता तिची वहिनी अभिनेत्री चारु असोपानेंही अफेअरच्या रंगलेल्या चर्चांवर सुष्मिताची बाजु घेत यावर प्रतिक्रिया दिली आहे.
नेहमीच मुलींना टार्गेट केले जात असल्याचे म्हणत तिने ‘द प्रॉब्लमेटिक कल्चर ऑफ कॉलिंग वुमन गोल्ड डिगर्स’ नावाचं एक आर्टिकल शेअर केले आहे . लोकं एखाद्या मुलीला ‘गोल्ड डिगर’ म्हणण्याआधी जरासुद्धा विचार करत नाही हे फारच दु:खद असल्याचे चारुने म्हटलं आहे.
याआधी सुष्मिताचा भाऊ राजीव सेननेही यावर प्रतिक्रिया दिली होती. त्याची बहीण रिलेशनशिपमध्ये आनंदी असल्याचे पाहून तो खूश असल्याचे त्याने म्हटले होते.
गेल्या काही दिवसांपासून राजीव सेन आणि चारु असोपा यांच्या नात्यावरही चर्चा रंगल्या. दोघेही घटस्फोट घेणार असल्याचे समोर आले होते.