मुंबई : बॉलिवूड मधील सर्वात क्यूट कपल सिद्धार्थ आणि कियारा ७ फेब्रुवारी विवाहबंधनात अडकले. राजस्थानातील जैसमलेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये या दोघांनी आयुष्यभरासाठी लग्नगाठ बांधली. त्यानंतर दोघांनी मुंबईत भव्य रिसेप्शन आयोजित केले होते.
रविवारी आयोजित केलेल्या कियारा-सिद्धार्थच्या रिसेप्शनमध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.
दरम्यान, अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा या जोडप्याने कुटुंब, मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या साक्षीने आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.
अशातच दिल्लीत त्यांच्या कुटुंबियांसोबत छोटेसे रिसेप्शन आयोजित केल्यानंतर, रविवारी मुंबईत देखील त्यांच्या बॉलिवूडमधील मित्रांसाठी मोठ्या धूमधडाक्यात एक भव्य रिसेप्शन आयोजित केले होते.
रिसेप्शनमध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यात अभिनेत्री आलिया भट्ट, नीतू कपूर, अभिषेक बच्चन, विद्या बालन आणि तिचा पती, अजय देवगण, काजोल, रणवीर सिंह, वरुण धवन, दिशा पटानी यांसारखे अनेक कलाकार हजर होते.