Saturday, September 23, 2023

‘गुलाबो सिताबो’ची आज रिलीज होणार : प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली

मुंबई – आयुष्मान खुराना आणि अमिताभ बच्चन यांच्या ‘गुलाबो सिताबो’ची आज रिलीज होणार आहे त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. त्यातच गेल्या काही दिवसापासून बिग बी या चित्रपटाचं सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. यातच त्यांनी आता कलाविश्वातील सेलिब्रिटींना एक चॅलेंज दिलं आहे. विशेष म्हणजे त्यांचं हे चॅलेंज अनेक कलाकारांनी स्वीकारलं असून त्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

Read More  वाहतूक शाखेकडून बंधनकारक : रिक्षात ‘प्लॅस्टिक’ पडदा नसल्यास कारवाई

‘गुलाबो-सिताबो’मध्ये बिग बी आणि आयुषमान खुराना हे दोघं घरमालक आणि भाडेकरु यांची भूमिका साकारत आहेत. विशेष म्हणजे अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमधून या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यातच बिग बींनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत कलाकारांना चॅलेंज दिलं आहे. बिग बींनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते चित्रपटातील एक डायलॉग बोलताना दिसत आहेत.

हा डायलॉग मजेशीर अंदाज असून तो न थांबता सलग पाच वेळा बोलण्याचं चॅलेंज त्यांनी दिलं आहे. ‘गुलाबो की खटर-पटर से तितर-बितर सिताबो, सिताबो के अगर-मगर से उथल-पुथल गुलाबो’, असा हा डायलॉग आहे.बिग बींनी दिलेलं हे चॅलेंज अभिनेता कार्तिक आर्यन, भूमि पेडणेकर, आयुषमान खुराना या कलाकारांनी स्वीकारलं असून त्यांनी त्यांचे व्हिडीओ शेअर केले आहेत

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या