16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeमनोरंजनहंसिका मोटवानी अडकणार विवाहबधंनात

हंसिका मोटवानी अडकणार विवाहबधंनात

एकमत ऑनलाईन

मुंबई : दिवाळी नंतर लग्नाचा सीजन सुरु होतो बॉलिवूडमध्येही लग्नाची धामधुम पहायला मिळणार आहे. सिद्धार्थ आणि कियारा, आथिया के.एल.राहुल यांच्यासुद्धा लग्नाची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यातच आता चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री हंसिका मोटवानी लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे.

बॉलिवुड अभिनेत्री हंसिका मोटवानी एका महिन्याच्या कालावधीच्या आतच विवाहबंधनात अडकणार आहे.
तिच्या जवळच्या मित्राच्या माहितीनुसार हा प्रेम विवाह आहे हंसिका तिच्या प्रियकराशी लग्न करत आहे. तो दुसरा कोणीनसून तिचा मित्र आणि बिझनेस पार्टनर सोहेल कथुरिया असल्याचे बोलले जात आहे.

हंसिका ४ डिसेंबरला लग्न करणार आहे. लग्नविधी २ डिसेंबर ते ४ डसेंबर दरम्यान आयोजित केला जाणार आहे. हंसिकाचे लग्न डेस्टिनेशन वेडिंग असणार आहे. या विवाहसोहळ्यात फक्त त्यांचे कुटुंब आणि जवळचे मित्रचं सहभागी होणार आहेत. हा विवाह जयपूरमधील मुंडोटा किल्ला आणि राजवाड्यावर आयोजित करण्यात येणार असल्याचं सांगितल आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या