मुंबई :शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊतांना अटक केल्यापासून राज्यातील अनेक स्तरांतून याबाबत प्रतिक्रिया उमटत आहेत. केवळ ११ लाखांसाठी त्रास दिला जातोय, अशी प्रतिक्रिया बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांनी दिली आहे.
यासंबंधीत त्यांचा एक व्हीडीओ सध्या ट्विटरवर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये जया बच्चन संजय राऊतांना पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात अटक केल्याबाबत बोलत आहेत.
जया बच्चन म्हणाल्या की, नक्कीच! आमचा संजय राऊतांना पूर्ण पाठिंबा आहे. त्यांना उगाच विनाकारण या प्रकरणात ओढले जात आहे. सध्या ईडीच्या कामावरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. फक्त ११ लाखांसाठी तुम्ही अशाप्रकारे एखाद्याला त्रास देत आहात.