22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमनोरंजनतो माझ्यासाठी मित्रापेक्षाही अधिक

तो माझ्यासाठी मित्रापेक्षाही अधिक

एकमत ऑनलाईन

मुंबई : अभिनेत्री कियारा अडवाणी अभिनेता शाहिद कपूरसोबत ती कॉफी विथ करणमध्ये हजेरी लावणार आहे. याआधीच्या एपिसोडमध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने कियाराशी असलेल्या नात्याबद्दल वक्तव्य केलं होतं. त्यामुळे सूत्रसंचालक करण जोहर साहजिकच कियाराला त्याच्याविषयी प्रश्न विचारणार होता. आता कियारा सिद्धार्थसोबतच्या नात्याबद्दल जाहीरपणे कबुल दिली की सिद्धार्थ तिच्यासाठी जिवलग मित्रापेक्षाही अधिक आहे.

पुढे जेव्हा करण तिला लग्नाचा प्रश्न विचारतो, तेव्हा ती म्हणते ‘माझ्या अवतीभवती असलेल्या लोकांचे सुंदर लग्न मी पाहिले आहेत आणि माझ्यासोबतही तेच घडावं अशी माझी इच्छा आहे. पण मी लग्न कधी करणार याचा खुलासा सध्या करू शकत नाही.’’ कियाराच्या या वक्तव्यावरून शाहिद आणि करणने लग्नाचे वृत्त खरे असल्याचे समजून त्यांच्या लग्नात एकत्र ‘डोला रे डोला’ या गाण्यावर डान्स करणार असल्याचे ठरवतात.

याआधीच्या एपिसोडमध्ये सिद्धार्थ मल्होत्राने अभिनेता विकी कौशलसोबत हजेरी लावली होती. त्यावेळी करणने सिद्धार्थलाही लग्नाबद्दलचा प्रश्न विचारला होता. करणच्या प्रश्नाचे उत्तर देताना सिद्धार्थनेही कियारासोबत लग्नाचे संकेत दिले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या