मुंबई : धर्मेंद्र आणि हेमा मालिनी या बॉलीवूडमधील खास जोडप्याचा आज लग्नाचा वाढदिवस. या शुभ दिवशीच आजारी असलेले धर्मेंद्र देवाच्या आणि चाहत्यांच्या कृपेने रूग्णालयातून घरी परतल्याची माहिती पुढे येते आहे.अनेक दिवसांपासून धर्मेंद्र स्रायूंच्या दुखण्याच्या त्रासाने त्रस्त होते. सोमवारी ते घरी आले असून त्यांच्या पकृतीतील सुधार बघून हेमा मालिनी भाऊक झाली.आनंद आणि अश्रू या दोन्ही गोष्टींचा वर्षाव झाला.त्याला कारणही तसेच होते.
८६ वर्षीय धर्मेंद्र जेव्हा रूग्णालयात होते तेव्हा हजारो चाहत्यांनी त्यांच्या राहत्या घरी त्यांना पत्र पाठवून बळ दिले. तर अनेकांनी त्यांची फोन करून विचारपूस केली. नेमका आज त्यांना डिस्चार्ज मिळालेला बघून हेमा मालिनीबरोबरच चाहतेही भाऊक झाले.लग्नाच्या वाढदिवशी आपला जोडीदार रूग्णालयातून घरी परत यावा यापेक्षा आनंददायी क्षण कुठला असू शकतो.हा आनंद हेमा मालिनीने तीच्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर करत सगळ्या चाहत्या वर्गाचे आभार मानले आहेत.