32 C
Latur
Tuesday, March 9, 2021
Home मनोरंजन काळजी घेऊनही बच्चन कुटूंबियांना कोरोनाचा विळखा पडला कसा?

काळजी घेऊनही बच्चन कुटूंबियांना कोरोनाचा विळखा पडला कसा?

एकमत ऑनलाईन

मुंबई : संपूर्ण देशभरात कोरोनाव्हायरसची प्रकरणं वाढत आहे. अनेक सेलिब्रिटींनाही कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. अभिनेते अमिताभ बच्चन अभिषेक बच्चन, अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि मुलगी आराध्यालादेखील कोरोनाची लागण झाली. बिग बी अमिताभ बच्चन कोरोनाबाबत लोकांना सातत्याने जागरूक करत होते. लॉकडाऊनदरम्यान बच्चन कुटुंब घरातच होतं. मग मग त्यांच्या घरापर्यंत कोरोना पोहोचला कसा, असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे.

बच्चन कुटुंबाच्या घरात कोरोना पोहोचण्यासाठी काही जण अमिताभ बच्चन तर काही जण अभिषेक बच्चन यांना जबाबदार मानत आहे, तर काही जणांच्या मते, मुंबईतील ज्या वॉर्डमध्ये त्यांचं घर आहे, त्याठिकाणी कोरोनाचं संक्रमण जास्त आहे. त्यामुळे एखाद्या स्थानिक व्यक्तीच्या माध्यमातून कोरोना तिथपर्यंत पोहोचला असावा असं सांगितलं जातं आहे.

शूटिंगसाठी मदत करणारे काही लोक बाहेरूनही आले होते?

कोरोना काळात अमिताभ बच्चन घरात असूनही सक्रिय होते. सोशल मीडियावर ते लोकांना जागरूक करणारे व्हिडीओ बनवत होते. लॉकडाऊनच्या समर्थनार्थ तयार करण्यात आलेल्या कलाकारांच्या एका शॉर्ट फिल्ममध्येही ते दिसले होते. हे सर्व शूट घरात झाले असले तरी शूटिंगसाठी मदत करणारे काही लोक बाहेरूनही आले होते का हे स्पष्ट झालेलं नाही. फिल्मप्रचार डॉट कॉमच्या सूत्रांच्या माहितीनुसार गेल्या दहा दिवसांत अमिताभ यांनी एक अॅड फिल्मसाठी डबिंग सुरू केलं होतं. त्यासाठी ते जलसामध्ये जायचे, तिथल्या स्टुओडिमध्ये डबिंग झालं होतं. तर काही सूत्रांच्या मते, या जाहिरातीच्या शूटिंगसाठी ते अंधेरीतील एका मोठ्या स्टुडिओतही गेले होते. गेल्या दहा दिवसांच्या या सक्रियतेमुळेच बिग बी यांनी आपल्या ट्वीटमध्येही म्हटलं आहे की गेल्या दहा दिवसांत जे लोक माझ्या संपर्कात आले त्यांनी खरबदारी म्हणून स्वत:ची कोरोना टेस्ट करून घ्यावी.

Read More  ऐश्वर्या-आराध्या यांनाही कोरोनाची लागण

स्टुडिओही सॅनिटाइज करण्यात आला

फिल्म प्रचार डॉट कॉमच्या मते, मार्च ते जून लॉकडाऊनमध्ये घरात राहणारा अभिषेक बच्चन ‘ब्रीथ: इन शेडोज’च्या डबिंगसाठी जुलैमध्ये वर्सोवातील एका स्टुडिओत सातत्याने जात होता. त्यावेळी तो मास्क लावत होता मात्र ़डबिंगदरम्यान किंवा येता-जाता प्रवासात त्याला व्हायरसची लागण झाली असावी. अभिषेक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर तो स्टुडिओही सॅनिटाइज करण्यात आला आहे. अभिषेक एक ‘बिग बुल’ या चित्रपटाचंही डबिंग करत होतो, अशी चर्चा आहे. यावेळी त्याचं येणंजाणं सुरू होतं.

बंगल्याच्या आसपास कोविड हॉटस्पॉट आहेत

अंधेरीच्या ज्या जुहू परिसरात बच्चन कुटुंबं राहतं, ते ठिकाण कोरोनाने प्रभावित आहे. त्यामुळेच काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेनं बच्चन यांच्या बंगला सॅनिटाइझ केला होता. बंगल्याच्या आसपास कोविड हॉटस्पॉट आहेत. अशात स्थानिक व्यक्ती घरी येत जात असेल तर त्यांच्यामार्फत हा व्हायरस बच्चन कुटुंबापर्यंत पोहोचला असावा.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,444FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या