मुंबई : बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीचा तिच्या घरातील फोटो व्हायरल झाला आणि त्यामुळे मोठा गोंधळ उडाल्याचे दिसून आले. त्या अभिनेत्रीचे नाव आलिया भट्ट. आमच्या घरात डोकवायला लाज कशी वाटत नाही असे म्हणत आालियाने घरात शिरून फोटो घेणा-या अज्ञात व्यक्तींविरोधात संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान,आलिया ही तिच्या घरातील लिव्हिंग रूममध्ये बसली होती. तेव्हा दोन अज्ञात व्यक्तींनी तिची शूटिंग करायला सुरुवात केली. आलियाने त्या दोघांनाही पकडले. त्यानंतर आलियाने सोशल मीडियावर मोठी पोस्ट शेअर केली. त्यामध्ये ती म्हणते, लोकांना आमच्याविषयी काय वाटते हेच कळत नाही. आम्हाला आमची स्पेस नावाची गोष्ट आहे की नाही, अशाप्रकारे शूटिंग करण्याची काय गरज होती, असा प्रश्न आलियाने उपस्थित केला आहे.
आलियाच्या बाजूने अनुष्काने तिची संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. लोकांना काहीही वाटत नाही. आलियाच्या बाबत जे काही झाले ते इतके लाजिरवाणे आहे की आपण कोणत्या पातळीवर आलो आहोत हे दिसते. असे म्हणत यावेळी अनुष्काने नाराजी व्यक्त केली आहे.