24.6 C
Latur
Saturday, January 16, 2021
Home मनोरंजन ट्रॅफिक सिग्नलवर जुळलं ऋतिक- सुजैनचे प्रेम

ट्रॅफिक सिग्नलवर जुळलं ऋतिक- सुजैनचे प्रेम

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबई विमानतळाजवळ असलेल्या ड्रॅगन फ्लाय क्लबवर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत क्रिकेट सुरेश रैनासह २७ सेलिब्रेटी आणि ७ स्टाफ मेंबर्सवर ऋतिक रोशनची माजी पत्नी सुझैन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन न केल्याने ही कारवाई केली गेली आहे. सुजैन एक इंटिरियर आणि फॅशन डिझायनर आहे. तिचा जन्म २६ आॅक्टोबर १९७८ रोजी मुंबईमध्ये झाला होता. बॉलिवूड अभिनेता संजय खान आणि झरीन यांची ती मुलगी आहे. सुझानला दोन मोठ्या बहिणी आहेत – सिमोन आणि फराह तर अभिनेता जायद खान तिचा धाकटा भाऊ आहे.

१९९५ मध्ये अमेरिकेच्या ब्रूक्स कॉलेजमधून सुजैनने इंटिरियर डिझायंिनगची पदवी घेतली. २०११ मध्ये तिने शाहरुख खानची पत्नी गौरीबरोबर काम करण्यास सुरुवात केली आणि मुंबईतील चारकोल प्रोजेक्ट फाउंडेशनची सुरूवात केली. भारतातील पहिले इंटिरियर फॅशन डिझाईन स्टोअर आहे.

ऋतिक रोशनसोबत झाले होते लग्न
सुझान ही हृतिक रोशनची एक्स वाईफ आहे. चार वर्षांच्या डेंिटगनंतर दोघांनी २०००मध्ये लग्न केले. हृतिकने ट्रॅफिक सिग्नलवर सुजैनला पाहिले आणि तिच्या प्रेमात पडला. त्यानंतर त्याने सुजैनला शोधले आणि व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तिला प्रपोज केले. सुजैनने ही होकर दिला होता. बरेच दिवस डेटिंगनंतर दोघांनी २०डिसेंबर २००० रोजी लग्न केले होते. लग्नाच्या 6 वर्षानंतर २००६ मध्ये ऋहान जन्म झाला आणि २००८ मध्ये ऋदानचा जन्म झाला.

३८० कोटी रुपयाचा घटस्फोट
हृतिक आणि सुझैनच्या लग्नात कधी दुरावा आले हे कोणालाच कळले नाही. १३ डिसेंबर २०१३ रोजी दोघांनी १७ वर्षांचे नातं संपवले. एका स्टेंटमेंटमध्ये ऋतिक-म्हणाला, सुजैन आणि मी १७ वर्षांचे नाते संपवण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी हा अत्यंत तणावपूर्ण काळ आहे आणि मी मीडियाला आमच्या प्रायव्हेसीमध्ये हस्तक्षेप न करण्याची विनंती करतो. मीडिया रिपोर्टनुसार, हृतिकने घटस्फोटानंतर सुजैनला पोटगी म्हणून ३८० कोटी रुपये दिले होते. या दोघांचा घटस्फोट हा देशातील सर्वात महागडा घटस्फोट असल्याचे म्हटले जाते.

पुणे स्मार्ट सिटीच्या ६ प्रकल्पांना पुरस्कार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,408FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या