22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeमनोरंजनहृतिकने चाहत्याच्या पडल्या पाया

हृतिकने चाहत्याच्या पडल्या पाया

एकमत ऑनलाईन

मुंबई : शनिवारी एका फिटनेस इव्हेंटमध्ये पोहोचलेला बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन या कार्यक्रमाच्या मंचावर त्याच्या एका चाहत्याच्या पाया पडला. याबद्दल त्याचे कौतुक केले जात आहे. या घटनेचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. युजर्स अभिनेत्याच्या कृतीचे कौतुक करून कमेंट करत आहेत.

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन केवळ त्याच्या डॅशिंग लूकसाठीच नाही तर त्याच्या उत्कृष्ट वर्तनासाठी देखील तो चाहत्यांमध्ये ओळखला जातो. शनिवारी एका फिटनेस इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या हृतिक रोशनने पुन्हा एकदा सिद्ध केले की तो खरोखर प्रामाणिक माणूस आहे. खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिनेत्याकडून चाहत्यांना प्रमोशनल गिफ्ट गुडी बॅग दिली जात होती.

तेव्हा एक चाहता स्टेजवर जाऊन अभिनेत्याच्या पाया पडला. प्रत्युत्तरात हृतिक रोशनही त्या चाहत्याच्या पाया पडला. यामुळे त्याने सर्वांना आश्चर्यचकित केले. अभिनेत्याचे हे हावभाव पाहून उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात अभिनेत्याला दाद दिली. या कार्यक्रमात हृतिक पिवळा टी शर्ट आणि पांढ-या पँटसह पांढ-या कॅपमध्ये खूपच स्मार्ट दिसत होता.

या कार्यक्रमाचा रिलीज झालेला व्हीडीओ एका पापाराझीने इन्स्टा अकाऊंटवर पोस्ट केला आहे. एका चाहत्याने या व्हीडीओच्या कमेंट बॉक्सवर लिहिले, ‘सो स्वीट ऑफ यू हृतिक रोशन! दुस-या एका चाहत्याने व्हीडीओवर कमेंट केली, ‘सो डाऊन टू अर्थ.’ त्याचे कौतुक करताना चाहत्यांनी त्याला ‘व्हेरी गुड सुपरस्टार’ आणि नाव टॅग केले. ‘सबसे नम्र सुपरस्टार’.

‘विक्रम वेधा’ चित्रपटात हृतिक वेगळ्या अवतारात
हृतिकने नुकताच त्याचा आगामी चित्रपट ‘विक्रम वेधा’चा टीझर शेअर केला आहे. त्याची दमदार अ‍ॅक्शन व्यक्तिरेखा या चित्रपटात पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट तमिळ अ‍ॅक्शन थ्रिलरची हिंदी आवृत्ती आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या