24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमनोरंजनहृतिकने दुखावल्या हिंदूंच्या धार्मिक भावना ; झोमॅटोच्या जाहिरातीने पडला वादात

हृतिकने दुखावल्या हिंदूंच्या धार्मिक भावना ; झोमॅटोच्या जाहिरातीने पडला वादात

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन आपल्या एका नव्या जाहिरातीने चांगलाच वादात सापडला आहे. ही जाहिरात झोमॅटो कंपनीची आहे,जी ऑनलाईन फूड डिलिव्हरीच्या व्यवसायातले मोठे नाव आहे. हृतिक त्या जाहिरातीत उज्जैनच्या महाकालेश्वर मंदीराचा उल्लेख करताना दिसत आहे.

हृतिकवर या नव्या जाहीरातीमुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप लागला आहे. झोमॅटोच्या एका नव्या जाहिरातीत हृतिक बोलताना दिसत आहे की,मला भूक लागली होती, मी महाकालमधून थाळी ऑर्डर केली . उज्जैन महाकालेश्वर मंदीराच्या नावाचा उल्लेख करत हृतिक रोशनची ही जाहिरात सोशल मीडियावर सुरु आहे,ज्यामुळे आता वाद निर्माण झाला आहे.

झोमॅटोच्या जाहिरातीत हृतिक कितीतरी छोट्या- मोठ्या शहरांची नाव घेताना दिसत आहे. यातीलच एकात तो उज्जैनचा देखील उल्लेख करतो. ज्यामध्ये हृतिक फूड डिलीव्हरी बॉयकडून खाण्याचे पॅकेट स्विकारल्यानंतर बोलतो,थाली खायचे मन केले, उज्जैनमध्ये आहे, तर महाकालकडून मागून घेतले”. हृतिकच्या याच जाहिरातीवरने आता गोंधळ सुरू झाला आहे. मंदीरातील पुजा-यांनी याचा विरोध करायला सुरुवात केली आहे. श्रद्धाळू लोक यामुळे हैराण तर झालेच आहेत पण नाराज देखील झाले आहेत.

पुजा-यांनी हृतिक रोशनला आणि झोमॅटो कंपनीला माफी मागण्याची मागणी केली आहे. या वादावर कलेक्टर आशिष सिंग म्हणाले आहेत की- ”हे प्रकरण माझ्या विभागात घडलं आहे,त्यामुळे याचा तपास सुरू आहे.

उज्जैनच्या महाकाल मंदीराच्या पुजा-याने म्हटले आहे की, ”जी कंपनी देशातील नागरिकांना शाकाहरीसोबत मांसाहरी अन्न घरपोच पोहोचवण्याची सेवा देते,त्यांना महाकालच्या नावाचा उल्लेख आपल्या जाहिरातीत करणे थांबवले पाहिजे. अन्यथा पुजारी संघ पोलिसांकडे याची रीतसर तक्रार करेल.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या