33.5 C
Latur
Saturday, June 3, 2023
Homeमनोरंजनआलियासाठी मी चांगला नवरा नाही

आलियासाठी मी चांगला नवरा नाही

एकमत ऑनलाईन

मुंबई : ​​बॉलीवूडचे स्टार कपल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. लग्न झाल्यापासूनच ही जोडी त्यांच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. आलिया नेहमी सोशल मीडियावर तिचे आणि रणबीरचे काही फोटो शेअर करत असते. आज आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. या जोडीचे चाहते अनेकदा त्यांच्याशी संबंधित प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवून असतात. अशा परिस्थितीत अनेक वेळा मुलाखतीदरम्यान आलिया आणि रणबीरला एक प्रश्न नेहमीच विचारला जाते की लग्न आणि राहाच्या येण्यानंतर त्याचे आयुष्य किती बदलले आहे. या प्रश्नावर नेहमीच रणबीरने त्याचे स्पष्ट मत मांडले आहे.

जरी रणबीर कपूर त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसा बोलत नाही. आलियासोबत लग्नानंतरही त्याने बराच काळ त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत कोणतेही वक्तव्य केले नाही. पण काळाच्या ओघात आता कलाकारांनी त्यांच्या लग्न आणि मुलीबद्दल मोकळेपणाने बोलायला सुरुवात केली आहे. रणबीरने अलीकडेच आलियासोबतच्या त्याच्या लग्नाबद्दल आणि तो स्वत:ला कोणत्या प्रकारचा नवरा समजतो याबद्दल बोलला. रणबीर कपूरच्या म्हणण्यानुसार, त्याला वाटते की तो अधिक चांगला प्रयत्न करत आहे. पण त्याच आयूष्य असे आहे की ते कधीही परिपूर्ण होणार नाही. तो एक ग्रेट मुलगा किंवा ग्रेट पती आहे किंवा भाऊ आहे असे त्याला मुळीच वाटत नाही . पण त्याला असा विश्वास आहे की त्याला चांगले बनण्याची इच्छा आहे आणि तो चांगला बनेल. तो योग्य मार्गावर आहे. म्हणजेच तो स्वत:ला एक चांगला नवरा बनविण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे असेही त्याने सांगितले.

आलिया आणि रणबीरने १४ एप्रिल २०२२ रोजी त्यांच्या मुंबईतील वास्तू येथे लग्न केले होते. जिथे मोजक्याच लोकांना बोलावले होते. लग्नानंतर अवघ्या महिन्याभरातच आई-वडील झाल्याची बातमी शेअर केली होती. आता हे जोडपे एका मुलीचे पालक आहेत. त्याच्या मुलीचे नाव राहा आहे. रणबीर शेवटचा ‘तू झुठी मैं मक्कार’ या चित्रपटात दिसला होता. त्याचबरोबर आलिया भट्टकडेही अनेक प्रोजेक्ट्स आहेत. ज्यामध्ये त्याच्या हॉलिवूड प्रोजेक्टचाही समावेश आहे.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या