26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeमनोरंजनमी रणवीर सिंगची दुसरी पत्नी; उर्फी जावेदचे वक्तव्य चर्चेत

मी रणवीर सिंगची दुसरी पत्नी; उर्फी जावेदचे वक्तव्य चर्चेत

एकमत ऑनलाईन

मुंबई : मॉडेल आणि टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. अनेकदा तिच्या विचित्र फॅशन स्टाईलमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. मात्र प्रत्येक वेळी पुन्हा काहीतरी हटके करून उर्फी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देते.

काही दिवसांपूर्वीच ‘कॉफी विथ करण’च्या ७ व्या सीझनच्या पहिल्याच एपिसोडमध्ये हजेरी लावलेल्या रणवीर सिंगने उर्फीच्या फॅशन स्टाईलचे कौतुक केले होते. पण आता मात्र रणवीरला हे कौतुक महागात पडणार की काय अशी चिन्हं आहेत. उर्फीने नुकतेच रणवीर सिंगबाबत एक वक्तव्य केले आहे ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वीच रणवीर सिंगने अभिनेत्री आलिया भट्टसोबत करण जोहरच्या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात करण जोहर आलिया आणि रणवीरसोबत रॅपिड फायर राऊंड खेळला होता. यावेळी करणने रणवीरला इतर कलाकारांच्या फॅशन सेन्सबद्दल प्रश्न उपस्थित केले.

एकदा वापरलेले कपडे पुन्हा न वापरणारा कलाकार कोणता? असा प्रश्न करणने रणवीरला विचारला. त्यावर रणवीरने एकही क्षण न घालवता लगेचच उर्फी जावेदचे नाव घेतले होते. त्याने यावेळी उर्फीच्या फॅशन सेन्सचं कौतुक केलं होतं.
आता उर्फी जावेदने रणवीरच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

रणवीरबाबत उर्फीने बिनधास्त वक्तव्य केले आहे. तिने थेट रणवीरला दुस-या लग्नासाठी प्रपोज केले आहे. म्हणजे एकंदर रणवीरने कौतुक केल्यानंतर उर्फी जावेद त्याच्यावर फिदा झाली आहे. रणवीरबाबत बोलताना उर्फी म्हणाली, ‘‘मी रणवीरवर प्रेम करते. तसं तर दीपिकानंतर त्याला कधी याची गरज भासणार नाही. पण त्याला जर कधी दुसरं लग्न करायचं असेल तर मी त्याची दुसरी पत्नी होण्यासाठी तयार आहे. मला असं करायला आवडेल.’’

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या