22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमनोरंजनमी सेल्फ मेड; मलायकाच्या वक्तव्याने उडाली होती खळबळ

मी सेल्फ मेड; मलायकाच्या वक्तव्याने उडाली होती खळबळ

एकमत ऑनलाईन

मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. मलायकाचे पहिले लग्न अभिनेता अरबाज खानसोबत झाले होते. या लग्नातून त्यांचा मुलगा अरहान खानचाही जन्म झाला. अरहान सध्या परदेशात असून पुढील शिक्षण पूर्ण करत आहे.

मात्र, मलायका आणि अरबाजने लग्नाच्या १९ वर्षांनंतर २०१७ मध्ये घटस्फोट घेतला. मात्र, आता मलायकाला ती सेल्फ मेड असल्याचे का म्हणावे लागले या घटनेकडे वळू. ‘दिल से’मधील ‘छैंया छैंया’ आणि त्यानंतर ‘दबंग’ चित्रपटातील ‘मुन्नी बदनाम हुई’ या आयटम साँगने मलायकाने इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण केली.

मलायकावर बोलताना, इंडस्ट्रीची ‘ड्रामा क्वीन’ म्हटल्या जाणा-या राखी सावंतने एकदा खरपूस समाचार घेतला आणि म्हटले की, सलमान खानच्या कुटुंबातील असल्याने मलायकाला आयटम गर्ल म्हणून ओळखले जात नाही.
खान कुटुंबामुळेच मलायकाला इंडस्ट्रीत अनेक संधी मिळाल्याचेही राखीने म्हटले होते. राखीच्या या प्रकरणावर संताप व्यक्त करताना मलायका म्हणाली होती की, ‘असे असते तर मी सलमान खानच्या प्रत्येक चित्रपटात आयटम साँग करायला हवे होते. यानंतर मलायका म्हणाली की, ‘मी सेल्फ मेड आहे, मला सलमान खानने बनवले नाही’

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या