27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमनोरंजनमी आता सिंगल आहे...; ईशान खट्टर

मी आता सिंगल आहे…; ईशान खट्टर

एकमत ऑनलाईन

मुंबई : अभिनेत्री अनन्या पांडे आणि ईशान खट्टर यांच्या ब्रेकअपच्या चर्चा काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर होत्या. अखेर ‘कॉफी विथ करण ७’ या चॅट शोमध्ये ईशानने अनन्यासोबतच्या नात्यावर मौन सोडले. अनन्या आणि ईशानचे ब्रेकअप झाल्याचे सूत्रसंचालक करण जोहरनेही स्पष्ट केले.

ईशान आणि अनन्या पांडे यांनी ‘खाली पिली’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. त्याआधी या दोघांना डिनर डेटवर, पार्ट्यांना आणि मालदीवच्या व्हेकेशनला एकत्र जाताना पाहिले गेले होते. मात्र रिलेशनशिपविषयी दोघांनी कधीच माध्यमांसमोर कबुली दिली नव्हती. त्यामुळे ब्रेकअपच्या चर्चांवरही दोघांनी मौन बाळगले होते.

दरम्यान कॉफी विथ करणच्या नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये ईशानने कतरिना कैफ आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत हजेरी लावली होती. ‘मी सिंगल आहे’ असे सिद्धांतने म्हणताच ईशाननेही सिंगल असल्याचे स्पष्ट केले. ‘मी इतका सिंगल आहे की माझ्यासोबत फिरता फिरता ईशानसुद्धा सिंगल झालाय’’, असे सिद्धांत म्हणाला.

हे ऐकताच करण ईशानकडे पाहून म्हणतो, ‘तुझेही अनन्यासोबत नुकतेच ब्रेकअप झाले आहे.’ यावर ईशान म्हणाला, कोणी कोणासोबत ब्रेकअप केले हे महत्त्वाचे नसून मी आता सिंगल आहे. ब्रेकअपनंतर अनन्याशी मैत्री कायम आहे. अनन्या आयुष्यभरासाठी माझी मैत्रीण राहावी अशी माझी इच्छा आहे. ती खरंच खूप चांगली व्यक्ती आहे. ती नेहमीच माझ्या प्रिय व्यक्तींपैकी एक असेल.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या