26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमनोरंजनकरणने लिहिली पत्नी बिपाशासाठी एक खास पोस्ट

करणने लिहिली पत्नी बिपाशासाठी एक खास पोस्ट

एकमत ऑनलाईन

मुंबई: अभिनेत्री बिपास बासू आणि अभिनेता करण सिंग ग्रोव्हर लवकरच पालक होणार आहे. दोघांच्याही घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. बिपाशा सध्या तिची प्रेग्नेंसी एंजॉय करत असून यासंदर्भातील फोटो ती तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत आहे. दरम्यान, आता करणने पत्नी बिपाशासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. बिपाशा गर्भवती असल्याचे कळाल्यावर काय फीलिंग होती, याबद्दलही करणने खुलासा केला आहे.

करणने मॅटर्निटी फोटोशूटमधील त्याचा आणि बिपाशाचा एक सुंदर फोटोही शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये करणने लिहिले, ‘‘हे असंख्य भावनांचे मिश्रण आहे. सर्व नवीन परंतु ओळखीचे. मी हे यापूर्वी केले असे नाही. पण हे मी माझ्या सर्वात मौल्यवान आणि सर्वात सुंदर स्वप्नात अनुभवले आहे. हे माझ्या डीएनएमध्ये आहे, असे वाटते आहे. ही एक अशी तीव्र भावना आहे जी मी व्यक्त केली नाही. कारण मला भीती वाटत होती की मी उत्साहात वेगळेच काही तरी करेन.’’

‘‘मला माझ्यात होणारे बदल जाणवत आहेत. मी गोष्टी समजून घेत त्या आणखी चांगल्या कशा बनवायच्या आणि स्वत:ला कसे चांगले बनवायचे, यासाठी सतत प्रयत्न करत असतो. मला एका स्त्रीमध्ये एक नवा जीव निर्माण करून तिच्या आयुष्याचा भाग बनवत असल्याबद्दल कृतज्ञ वाटतेय’’ असे करणने पोस्टच्या शेवटी म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या