मुंबई : ‘बिग बॉस’चा यंदाचा विजेता म्हणून गौरवलेल्या एमसी स्टॅनचे सोशल मीडियावर अजूनही कौतुक होताना दिसतेय. पी टाऊनमधील बेबी एमसी स्टॅन हा भारतामध्ये प्रसिद्ध रॅपर आहे. या सगळ्यात टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील वादग्रस्त नाव उर्फीने एमसी स्टॅनचे कौतुक केले आहे. तिने त्याच्याविषयी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.
उर्फीने थेट आता एमसी स्टॅनविषयी प्रेमाची भावना व्यक्त केली आहे. मला तो खूप आवडतो आणि माझे त्याच्यावर खूप प्रेम आहे, अशा शब्दांत उर्फीने एमसी स्टॅनवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. जेव्हा एमसी स्टॅनने ‘बिग बॉस’मध्ये एन्ट्री केली तेव्हापासून मला असे वाटत होते की, त्याने हा शो जिंकावा. आणि तसे झालेही. त्याच्या विजयाने मला खूप आनंद झाला आहे.
‘तुला एमसी स्टॅनसोबत काम करायला आवडेल का?’ असा प्रश्न विचारल्यानंतर उर्फीने जे उत्तर दिले ते तिच्या चाहत्यांना आवडले आहे. ती म्हणाली, ‘माझी तयारी आहे. पण एमसी स्टॅन हा आता मोठा माणूस झाला आहे.’