24.7 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeमनोरंजनइब्राहिम अली खानची लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री

इब्राहिम अली खानची लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता करण जोहर केवळ त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत राहतो असे नाही, तर यासोबतच तो बॉलीवूडमध्ये नवीन चेह-यांना लॉन्च करण्याबाबतही चर्चेत असतो. अभिनेत्री आलिया भट्ट, जान्हवी कपूर, अनन्या पांडेपासून ते शनाया कपूरपर्यंत करणने इंडस्ट्रीत संधी दिल्या आहेत. करण फक्त स्टारकिड्सलाच लाँच करतो यावरून त्याच्यावर अनेकदा टीकाही झाली. दरम्यान आता करण जोहर आणखी एक स्टारकिड इब्राहिम अली खानला लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान बॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या यादीत स्थान मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. केदारनाथ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणा-या साराने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून आपल्या अभिनयाने ती प्रेक्षकांची मने जिंकत आहे. त्याचवेळी अभिनेत्रीचा भाऊ आणि सैफ-अमृता यांचा मुलगा इब्राहिम अली देखील चित्रपटांमध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणार असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या