28.5 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeमनोरंजनकेस पांढरे हवे असतील तर दुप्पट मानधन : अनिल कपूर

केस पांढरे हवे असतील तर दुप्पट मानधन : अनिल कपूर

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलिवूडचा एव्हरग्रीन अभिनेता म्हणून अनिल कपूर यांना ओळखले जाते. अनिल कपूर त्यांच्या अभिनयासोबतच फिटनेससाठी देखील लोकप्रिय आहेत. वयाच्या ६५ व्या वर्षी देखील अनिल कपूर यांचा अभिनय आणि उत्साह तरुणांना लाजवेल असाच आहे. अनिल यांनी नुकताच एका समिटमध्ये सहभाग घेतला होता.

यावेळी त्यांनी हॉलीवूड सुपरस्टार्स जॉर्ज क्लूनी यांच्यासोबत मनमोकळा संवाद साधला. या संवादात त्यांनी बॉलीवूड आणि बॉलीवूड मधील त्यांच्या प्रवासामधील अनेक खास गोष्टी शेअर केल्या. एखाद्या सिनेमासाठी जर दिग्दर्शकाला अनिल कपूर यांचे केस पांढरे हवे असतील तर या खास लूकसाठी आपण दुप्पट फी आकारतो तर काळ्या केसांमधील लूकसाठी नॉर्मल फी आकारतो असे सांगत अनिल कपूर यांनी एक खास किस्सा शेअर केला.

जॉर्ज क्यूनीसोबतच्या संवादादरम्यान अनिल कपूर यांनी दिल धडकने दो या सिनेमा वेळीचा तो खास किस्सा शेअर केला. कपूर यांना या सिनेमांमध्ये एका वयस्क बिझनेसमनची भूमिका साकारायची आहे याची कल्पना दिग्दर्शक जोया अख्तर यांनी दिली. या सिनेमासाठी अनिल कपूर यांना जॉर्ज क्लूनी सारखा लूक ठेवायचा आहे असे जोया यांनी सांगितले. जॉर्ज क्लूनी सारख्या या लूकसाठी त्यांना जवळपास १०० तास मेकअप रूममधील खुर्चीवर बसून राहावं लागलं होतं असं अनिल कपूर यांनी सांगितले. तर सर्व अवॉर्ड्स घेण्यासाठी देखील अनिल कपूर यांनी हाच लूक कायम ठेवला होता असंही त्यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या